Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

धक्कादायक : दोन मित्रांची एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या

पिंपरी-चिंचवड : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील मोशी परिसरात शनिवारी (12 एप्रिल 2025) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. (Pune Suicide) अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथील दोन जिवलग मित्र, तुषार अशोक ढागे (वय 25) आणि सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय 30) यांनी खिरीड वस्ती, भारतमाता चौकाजवळील एका लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

---Advertisement---

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एका स्थानिक नागरिकाने खिरीड वस्ती येथे दोन तरुणांचे मृतदेह एकाच झाडाच्या फांदीला लटकलेले पाहिले आणि तातडीने पोलिसांना कळवले. एमआयडीसी भोसरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवले. प्राथमिक तपासात मृतदेहांची ओळख तुषार ढागे आणि सिकंदर शेख अशी झाली. दोघेही खासगी वाहनचालक म्हणून काम करत होते आणि जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)

पोलिसांनी सांगितले की, तुषार आणि सिकंदर हे जवळचे मित्र होते आणि एका दिवसापूर्वीच ते पुण्यात आले होते. त्यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही, ज्यामुळे आत्महत्येमागील (Pune Suicide) कारणांचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत आहे. (हेही वाचा – UPI Down : GPay, PhonePe, Paytm ची सेवा ठप्प; वापरकर्ते हैराण)

---Advertisement---

आत्महत्येचे कारण अस्पष्ट | Pune Suicide

पिंपरी-चिंचवड पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी पत्रकारांना सांगितले, “प्राथमिक तपासात असे दिसते की, दोघांनी एकाच फांदीला गळफास घेतला आहे. ही आत्महत्या आहे की अन्य काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे. मृतदेहांवर कोणत्याही बाह्य जखमांचा खुणा आढळल्या नाहीत, आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.” त्यांनी पुढे नमूद केले की, सिकंदरचे वैवाहिक जीवन अस्थिर होते आणि त्याचा पत्नीशी वाद झाला होता, परंतु हे आत्महत्येचे कारण आहे की नाही, याची पुष्टी बाकी आहे. (हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध ; वाचा काय आहेत नवीन अपडेट)

आत्महत्येमागील नेमके कारण अस्पष्ट असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दोघांच्या मोबाइल फोन ताब्यात घेतले असून, त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि मेसेजेस तपासले जात आहेत. याशिवाय, त्यांनी पुण्यात येण्यामागील हेतू आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.  (हेही वाचा – पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; रिश्टर स्केलवर 5.8 तीव्रतेची नोंद)

तुषार आणि सिकंदरच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. सिकंदरच्या एका नातेवाईकाने सांगितले, “तो आणि तुषार खूप जवळचे मित्र होते. त्याने असे काही करेल, अशी आम्हाला कल्पनाच नव्हती. त्याच्या पत्नीशी काही मतभेद होते, पण इतका टोकाचा निर्णय तो घेईल, हे कोणीच विचार केला नव्हता.” तुषारच्या काकानेही पोलिसांना सांगितले की, तुषार हा शांत स्वभावाचा होता आणि त्याच्यावर कोणताही मानसिक दबाव असल्याचे त्यांना माहीत नव्हते. (हेही वाचा – ब्रेकिंग : ‘ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो’, अमेरिकेच्या गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles