जुन्नर : माणकेश्वर येथे मनरेगा कामगार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
धरती आबा, आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आणि आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आदिवासी पोशाखात आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले.
यावेळी मारुती कोरडे यांनी आदिवासी क्रांतीकारकांच्या कथा सांगितल्या, सतिश कोरडे यांनी आदिवासी दिनानिमित्त आदिवासीचा इतिहास, प्रथा, परंपरा आणि आदिवासी दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.
या कार्यक्रमात चावंड ग्रामपंचायतच्या उपसरपंच माधुरीताई कोरडे, माणकेश्वर गावचे पोलीस पाटील रोहिदास कोरडे, जुन्नर तालुका किसान सभेचे कोंडीभाऊ बांबळे, वन धन केंद्रांचे सदस्य धर्मा कोरडे, मारुती कोरडे, बाळू जानकु कोरडे, शंकर उतळे, धोंडू बांबळे, किसन शेळकंदे, एकनाथ मुंढे, दगडू कोरडे, लक्ष्मण कोरडे, गुलाब शेख, नागेश मुकणे, निलेश लांडे, अजित बांबळे, रोहित दिघे तसेच मनरेगा कामगार, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.