Tuesday, June 18, 2024
Homeग्रामीणजुन्नर : हडसर मनरेंगाच्या माध्यमातून शाळेच्या कंपाउंडचे काम सूर

जुन्नर : हडसर मनरेंगाच्या माध्यमातून शाळेच्या कंपाउंडचे काम सूर

जुन्नर (पुणे) : कोटमवाडी (ता. जुन्नर) येथे जिल्हा परिषद मनरेगा विभाग, पंचायत समिती जुन्नर आणि अखिल भारतीय किसान सभेेेच्या विशेष प्रयत्नातून मनरेगा योजनेतून कोटमवाडी जिल्हा परिषद शाळेच्या ऑल कंपाउंडचे उद्घाटन करण्यात आले आहे.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सहाय्यक आयुक्त पांढरे, मनरेगा बिडीओ देव, मनरेगा एपीओ गायकवाड, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, किसान सभेचे तालुका अध्यक्ष डॉ. मंगेश मांडवे, उपाध्यक्ष विलास डावखर, सदस्य संजय साबळे व आधिकारी वर्ग उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे सहाय्यक आयुक्त पांढरे म्हणाले, “मनरेगा योजना ही गावविकासाची चावी आहे यातून गावाला आणि गावातील लोकांचा विकास झपाट्याने होईल.”

मनरेगा पुणे जिल्हा परिषदेच्या (BDO) देव म्हणाल्या, “मनरेगा योजने अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती दिली आणि ग्रामीण भागात महिलांना सक्षम करण्यात मनरेगा योजना वरदान ठरेल.”

या पूर्वी मनरेगा योजनेच्या माध्यमातून कोटमवाडी, हडसर, पेठेचीवाडी येथे 800 वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्याला बिहार पॅटर्नची जोड देऊन वृक्ष संगोपन करण्यासाठी 4 महिलांची 3 वर्षीसाठी नेमणूक करून रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांना प्रतिदिन 238 आणि दरमहा 6,188 रुपये मिळतात.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गावातील जेष्ठ व्यक्ती, तरुण वर्ग, ग्रामपंचायत सदस्य व मनरेगा गाव समितीचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय