Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणजुन्नर : भरधाव वाहनांचे बळी ठरतायेत वन्य प्राणी

जुन्नर : भरधाव वाहनांचे बळी ठरतायेत वन्य प्राणी

जुन्नर / पौर्णिमा बुचके : रस्त्यावर वाहनांची वाढलेली गती मुक्या प्राण्यांचे जीवांचे बळी घेण्यास कारणीभूत ठरत आहे. सरपटणारे प्राणी, जंगलातून रस्ता पार करणारे जीव,  पाळीव प्राणी हे अपघातात मृत्यू मुखी पडत आहे. 

नामशेष होत चाललेल्या सापांचे प्रमाण यामध्ये असल्याचे दिसून येते, महामार्गावर वाहने चालवताना चालकांचे गतीवर नियंत्रण राहत नसल्याने अनेक बाबींवरून स्पष्ट झाले आहे. रात्रीच्या वेळी तर खूप प्रमाणात गती वाढत आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील  काही रस्त्यावर बिबटे, साप, कोल्हे, तरस, रानमांजर यांसारखे मुक्या प्राण्याचा अपघाताने बळी ठरत आहे. 

अपघातात जखमी होणाऱ्या प्राण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून रात्रीच्या वेळी वाहनचालकांनी वाहन चालवताना गतीवर नियंत्रण ठेवावे. तसेच वाहनातून जाताना अचानक समोर जखमी प्राणी, पक्षी, साप दिसल्यास आपल्या जवळील वनविभाग मध्ये कळवावे किंवा सर्पमित्रांना कळवा असे आहवान वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष सर्पमित्र आकाश माळी, तसेच जुन्नर रेस्क्यू टीम चे सदस्य सतीश घाडगे, दीपक माळी यांनी नागरिकांना आवाहन  केले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय