जुन्नर / रफिक शेख : वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक राजुरी येथे दि.२५ जुलै २०२१ रोजी संपन्न झाली.
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जुन्नर तालुक्यातील आजपर्यंत च्या कामकाजाचा आढावा, भविष्यातील पक्षसंघटनेची ध्येयधोरणे निश्चित करणे, महिला तसेच युवा संघटन वाढविणे, सभासद नोंदणी अभियान राबविणे, गावोगावी पक्षाच्या शाखा स्थापन करणे व, तसेच आपापसांत असणारे मतभेद विसरुन एकजुटीने पक्षवाढीसाठी काम करणे, आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे पुणे जिल्हा सचिव गिरीराज वाव्हळ, जिल्हा सहसचिव गणेश जनार्दन वाव्हळ, जिल्हा सहसंघटक सागर जगताप, महिला आघाडी च्या तालुका अध्यक्ष निलम खरात, महासचिव पुनम दुधवडे, वंचित बहुजन आघाडी चे उपाध्यक्ष फिरोझ पटेल, संतोष डोळस, कार्याध्यक्ष महेश तपासे, सचिव अल्पेश सोनवणे, कार्याध्यक्ष दिपाली थोरात, उपाध्यक्ष पुजा सोनवणे, पुजा जगताप, मंदार कोळंबे, रविंद्र खरात, गौतम दुधवडे, सुमित थोरात उपस्थित होते.