Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर : कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार

नगर- कल्याण महामार्गावरील वाटखळे येथील घटना

---Advertisement---

ओतूर : अहमदनगर – कल्याण महामार्गांवरील वाटखळे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहीती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

अपघातात नामदेव रामचंद्र मराडे (वय – ५० वर्षे, रा.घोडेगाव, ता.आंबेगाव, सध्या रा.कोल्हेवाडी, ता.जुन्नर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला तसेच कारमधील हरचरणजीत कौर वय ७१ वर्षे (हल्ली राहणार मिलीटरी कॅम्प, अहमदनगर) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदरचा अपघात सोमवारी दि.१८ रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

---Advertisement---

अपघाताची माहिती समजताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक परशुराम कांबळे, पोलीस उपनिरिक्षक आकाश शेळके, पोलीस कर्मचारी बाळशिराम भवारी, पोलीस मित्र गवारी, मडके हे घटनास्थळी तात्काळ हजर झाले. अपघातातील कार ओतूरकडून कल्याण दिशेला जात होती आणि दुचाकी मढ बाजुकडून पिंपळगाव जोगा गावाकडे जात असताना वरील अपघात घडल्याची पोलिसांनी सांगितले.

अपघातामध्ये मृत पावलेले दुचाकीस्वार नामदेव मराडे हे आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असून ते आरोग्य सर्वे करण्यासाठी मढकडून पिंपळगाव जोगा परीसरात नगर- कल्याण महामार्गाने दुचाकी वर येत होते. त्याचवेळी महामार्गावरून ओतूरकडून कल्याणच्या दिशेने भरधाव वेगात कार चालली होती. त्या कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. मोटारीतील जखमींना ओतूर पोलिस व स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करत आहे.

हेही वाचा

ब्रेकिंग : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

राज्यातील सत्ता संघर्षाबाबत आता न्यायालयाने दिली ‘ही’ तारीख, आज सुप्रीम कोर्टात काय झाले पहा !

मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्वपूर्ण सुचना

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक होणार ?

अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या किसान सभेची मागणी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे 128 थेट मुलाखतीद्वारे भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles