जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) जुन्नर तालुका समितीच्या वतीने शिक्षण हक्क कायद्यात केलेला जनहितविरोधी बदल रद्द करण्यात यावे, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Junnar
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य सरकारने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये अत्यंत चुकीचे बदल केले आहेत. त्याबाबतचे राजपत्र दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी करण्यात आले आहे. कुठल्याही खाजगी शाळेच्या एक किलोमीटरच्या आवारामध्ये एखादी सरकारी किंवा अनुदानित शाळा असेल; तर ती शाळा गरीब विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५% आरक्षण अंतर्गत प्रवेश देऊ शकणार नाही. तसेच सरकारने २०१७ पासून आतापर्यंतचे आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शुल्क रुपये २४०० कोटी शाळांना दिलेले नाहीत. त्यामुळे खाजगी शाळा यंदाची प्रवेश प्रक्रिया राबवत नाही आहे. उलट सरकारने आपली जबाबदारी झटकून देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यात नको ते बदल केले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील गरीब घटकातील लाखो विद्यार्थी प्रवेशापासून मुकले जातील. तरी या पार्श्वभूमीवर या कायद्यामध्ये केलेला जनहितविरोधी बदल रद्द करण्यात यावे, अशी मागणी एसएफआय ने केली आहे.
यावेळी एसएफआय पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे, जिल्हा सचिवमंडळ सदस्य राजू शेळके, जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र बुळे, ऋषाली दाभाडे, सहसचिव अंकिता मांडवे, सचिवमंडळ सदस्य वृषाली साबळे, सदस्य आश्विनी रंगडे, ऐश्वर्या मोडक इत्यादी उपस्थित होते.
Railway : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 733 पदांसाठी भरती
Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..
AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती
MSCE Pune : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मोठी भरती
Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती
Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती
NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती
NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती
Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती
SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती
Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती