Junnar : सामाजिक वनीकरण विभाग, जुन्नर मार्फत राष्ट्रीय हरीत सेना उपक्रमांतर्गत जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय आणि कृष्णराव मुंढे विद्यालय येथील ८० विद्यार्थ्यांकरिता नेचर कॅम्पचे आयोजन पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील निसर्गरम्य नाणेघाट येथील देवराई जंगलात करण्यात आले होते, अशी माहिती सामाजिक वनिकरण विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी स्नेहा राऊत यांनी दिली. Junnar news
जंगल भटकंती अंतर्गत पक्षी निरीक्षण, निसर्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निसर्ग अभ्यासक यश मस्करे, पक्षीमित्र सुभाष कुचिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मुख्याध्यापक बाळासाहेब कवडे, पर्यवेक्षक संजय खराडे, शिक्षक प्रफुल्ल बोऱ्हाडे, हिरामण शिंगोटे, सतीश गायकवाड, निलेश काशीद, प्रशांत घुले, प्रदीप जुगदर, सुभाष आढारी, ललिता थोरवे, रेणुका परबत, वनविभागाचे सचिन मोढवे, फल्ले मॅडम आदी उपस्थित होते.
विविध जातीचे पक्षी, फुलपाखरे, सांबर, राज्य प्राणी शेकरू, वनस्पती यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.


हे ही वाचा :
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार
मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द
हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले
शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ