Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणजुन्नर : लोकभारती पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न

जुन्नर : लोकभारती पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न

जुन्नर / रफिक शेख : आज दि. 7 ऑगस्ट 2021 रोजी शिवजन्मभूमी जुन्नर  येथे जुन्नर तालुका अध्यक्ष खालिद पटेल यांच्या हस्ते लोकभारती पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. 

यावेळी जुन्नर शहर महिला अध्यक्ष रिना राजू खरात, उपाध्यक्ष शगुप्तां इनामदार, अणे शाखा अध्यक्ष सचिन पवार, जुन्नर शहर कार्याध्यक्ष रफिक तकि, सदृश्य संपत शिंदे, जुन्नर तालुका पूर्व पश्चिम विभाग उपाध्यक्ष सौकत शेख, शिंदे वाडी शाखा अध्यक्ष जब्बार शेख, सचिन गोफणे, पेमदरा शाखा अध्यक्ष गणेश गोफने, जुन्नर तालुका महिला अध्यक्षा छाया उपालकर, राजुरी शाखा अध्यक्ष मीना मोरे, आळे शाखा अध्यक्ष वंदना शिरतर, सचिन गोफने, मुस्तफा सय्यद उपस्थित होते. 

यावेळी खालिद पटेल यांनी आपले मनोगत वक्त केले व गरिबांचे काम निश्चित केले जातील असे आश्वासन दिले. तसेच रेशनिंग, घरकुल बाबत योग्य पाठपुर्वठा करून जनतेच्या समस्या सोडविल्या जातील असेही ते म्हणाले.

फुले – शाहू – आंबेडकर सामाजिक संघटनेचे राज्य अध्यक्ष अंबादास पवार, मीना मोरे आदींनी आपले मनोगत वक्त केले. जुन्नर शहर व तालुक्यातील लोकभारतीचे महिला पदाधिकारी व इतर पदाधिकारी सभासद उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय