पुणे : जुन्नर तालुक्यातील (Junnar) नारायणगड परिसरातील आदिवासी कुटुंबांना वन जमिनीतून बाहेर काढल्याप्रकरणी विभागीय वनहक्क समितीचे सदस्य किरण लोहकरे (Kiran Lohkare) यांनी विभागीय उपायुक्त रामचंद्र शिंदे यांना भेटून या प्रकरणात लक्ष घालण्याची व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यातील खोडद, नगदवाडी, वडगाव कांदळी, येडगाव व हिवरे तर्फे नारायणगाव या गावातील जवळपास १४८ वैयक्तिक वनहक्क धारक अपिलकर्त्यांना वन जमिनीतून अमानुषपणे निष्कासित केल्या प्रकरणी विभागीय वनहक्क समितीचे सदस्य किरण लोहकरे (Kiran Lohkare) यांनी उपायुक्त रामचंद्र शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
किरण लोहकरे म्हणाले, “वरील गावातील वनहक्क समित्या या वनहक्क कायद्यातील तरतुदी नुसार तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदा असून या सर्व समित्या तात्काळ बरखास्त करून ही सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्याबाबत तसेच वनविभागाचा १८ जानेवारी २०१७ चा वन अतिक्रमणाचा अहवाल की ज्यात संबंधित कुटुंबांचे अतिक्रमण हे १९९५ सालचे म्हणजेच २००५ पूर्वीचे असल्याबाबत नोंद आहे तो ग्राह्य धरण्याची मागणी केली आहे.
विभागीय उपायुक्तांनी निवेदनाची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले असल्याचे लोहकरे यांनी सांगितले.
हे ही वाचा :
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले
मोठी बातमी : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी
मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला
धक्कादायक : पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, एकाचा मृत्यू
Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती