Thursday, December 26, 2024
Homeजुन्नरजुन्नर : ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी 7 फेऱ्यात..! कोणती गावे कोणत्या फेरीत ते...

जुन्नर : ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी 7 फेऱ्यात..! कोणती गावे कोणत्या फेरीत ते पहा !

जुन्नर / शिवाजी लोखंडे : जुन्नर तालुक्यातील निवडणुका झालेल्या 17 पैकी 14 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांसाठी रविवारी दि.18 रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवार दि.20 रोजी सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.

तहसील कार्यालयाच्या आवारातील तलाठी कार्यालय येथे एकूण सात टेबलावर सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी वीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आंबे व हिवरे तर्फे मिन्हेर या दोन ग्रामपंचायतीची सरपंच व सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. त्यांचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल. वानेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी एकही अर्ज आला नाही. 

चौदा ग्रामपंचायतीचे मतमोजणीचे नियोजन पुढीलप्रमाणे :

1. पहिली फेरी : काळवाडी, हातवीज.

2. दुसरी फेरी : बोतार्डे, शिंदे, सुलतानपूर.

3. तिसरी फेरी : पारगाव तर्फे आळे, काले. 

4. चौथी फेरी : झापवाडी, भिवाडेखुर्द.

5. पाचवी फेरी : साकोरी तर्फे बेल्हे,सोमतवाडी. 

6. सहावी फेरी : विठ्ठलवाडी, अणे. 

7. सातवी फेरी : सावरगाव.

Lic

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय