जुन्नर : आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानेश्वर केंद्रे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सह्याद्री विद्या विकास मंडळ नारोडी संस्थेच्या कै.एस.एम.जोशी कर्णबधीर विद्यालय नारोडी च्या विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन दिले. यावेळी सोबत मुख्याध्यापक एम.डी.औटी, शिक्षक जे.ए.आजेटराव, जगताप, चंद्रकांत हुले, डी.बी. मानकर, एस.आर. चासकर, शांताराम बनकर आणि विद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सह्याद्री विद्या विकास मंडळ नारोडी संस्थेचे सचिव चंद्रशेखर हुले यांनी या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपल्या बद्दल ज्ञानेश्वर केंद्रे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कौतुक केले. ही सेवाभावी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे सचिव चंद्रशेखर हुले, मुख्याध्यापक एम.डी.औटी आणि सर्व कर्मचारी यांचे केंद्रे कुटुंबियांच्या वतीने ज्ञानेश्वर केंद्रे यांनी मनःपूर्वक आभार मानले.