१. विद्यार्थ्यांसाठी ‘मनोदर्पण’ चे उदघाटन
केंद्रीय मानव संसाधन मंत्री श्री. रमेश पोखरीयल निशंक यांनी आज सकाळी २१ जुलै ला ११ वाजता ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत” मनोदर्पण’ कार्यक्रम लाँच केला.
विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मानसिक आरोग्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोविड-१९ मूळे
विद्यार्थी वर्ग तणावात आहे. ऑनलाईन शिक्षण देणे ही महत्वाचे आहे पण याच वेळी मानसिक आरोग्यावर ही समान महत्व दिले गेले पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम लाँच केला गेला आहे.
२. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कोर्टाचे आव्हान
३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याच्या युजीसीच्या निर्णयाला १० हून अधिक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून हा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांमध्ये एक विद्यार्थी कोरोना पीडित देखील आहे. याचिकाकर्त्यां च्या मते पदव्युत्तर अंतिम वर्षांचे अनेक विद्यार्थी किंवा मग त्यांचा परिवारातील सदस्य कोरोना संक्रमित आहे. अशा परिस्थितीत त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षेला बसणे अनिवार्य करणे हे घटनेच्या कलम २१ नुसार त्यांच्या जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.
३. मुलांच्या संगोपनासाठी राज्य सरकार धोरण तयार करेल
राज्य सरकार मुलांच्या देखभाल व पुनर्वसनासाठी धोरण राबवित आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, हे धोरण केवळ अनाथांसाठीच नाही, तर ज्यांना काळजी व संरक्षणाची आवश्यकता आहे अशा मुलांसाठीही असेल. या कार्यक्रमांतर्गत मुलांना काही काळ घरे दिली जातील. कुटुंबासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. हे धोरण मुंबई उपनगर भागात, सोलापूर, पुणे, पालघर आणि अमरावती येथे प्रायोगिक तत्वावर लागू केले जाईल.
४. अकरावी प्रवेश प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप, शिक्षण विभागाची नोटीस
नागपुरातील केंद्रीय प्रवेश समिती व इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेविरोधात संस्था चालविणाऱ्या गटांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली आहे. राज्य शालेय शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया आयोजित केली होती. याचिकाकर्ता न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशन आणि इतरांनी केंद्रीय प्रवेश समितीच्या कामकाजात अनियमिततेचा आरोप केला आहे.
५. इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलिमिली’
काल २० तारखेपासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सह्याद्री वाहिनीवर, ‘टिलिमिली’ ही मालिका सुरू करण्यात आली आहे. बालभारती च्या पुस्तकातील दररोज एक पाठ एका एपिसोड मध्ये शिकविण्यात येणार आहे. एकूण ६० एपिसोड वेगवेगळ्या वर्गासाठी वेगवेगळ्या वेळेवर असणार आहे.
सकाळी साडे सात ते दहा वाजता च्या मधात ५ ते ८ वी पर्यंत तर दहा ते दुपारी साडे बारा वाजेपर्यंत १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम असणार आहे.