कोल्हापूर कागल : डी आर माने महविद्यालय कागल या ठिकाणी आज तब्बल 100 विद्यार्थ्यांच्या सोबत जोडीदाराची विवेकी निवड ही संवादशाळा झाली.. सर्वांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला..राजवैभव शोभा रामचंद्र ने जोडीदाराची विवेकी निवड का गरजेची आहे, प्रेम आणि आकर्षण यातील फरक याबद्दल मार्गदर्शन केले.
जोडीदाराची विवेकी निवड कशी याबद्दल रेश्मा खाडे ने मार्गदर्शन केले तर प्रेम, लग्न, जात, हिंसा याबद्दल चर्चा करत संवाद शाळांचा शेवट करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा गाडे सर होते प्रास्ताविक गुरव मॅडम यांनी केले तर आभार गौंड सर यांनी व्यक्त केले.
या संवाद शाळेंचे आयोजन कागल अंनिस शाखेकडून केले होते.
यावेळी कागल अनिस चे प्रधान सचिव कपिल पाटील सर,युवा विभाग कार्यवाहक अभी शिंदे, हरी आवळे तसेच कॉलेज चे प्राध्यापक आणि प्राध्यापिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते.