Tuesday, January 14, 2025
HomeNewsनवी दिल्लीत काळ्या झेंड्यांचे संयुक्त निदर्शन आणि मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन

नवी दिल्लीत काळ्या झेंड्यांचे संयुक्त निदर्शन आणि मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आज (दि.२६) राजधानी नवी दिल्लीत काळ्या झेंड्यांचे संयुक्त निदर्शन झाले आणि मोदी-प्रणित भाजप-आरएसएस सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

यावेळी शेतकरी विरोधी कामगार कायदे रद्द करा, कामगार विरोधी कायदे मागे घ्या या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात किसान सभेचे सरचिटणीस हनन मोल्ला, अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सहसचिव विजू कृष्णन, कोषाध्यक्ष पी. कृष्ण प्रसाद, सीटूच्या सचिव ए. आर. सिंधू, शेतमजूर युनियनचे सहसचिव विक्रम सिंह, जनवादी महिला संघटनेच्या सरचिटणीस मरियम ढवळे, सहसचिव आशा शर्मा, केंद्रीय कमिटी सदस्य मेमुना मोल्ला व अर्चना प्रसाद, एसएफआयचे सहसचिव धिनीत धेंटा, लोकविज्ञान चळवळीचे दिनेश अब्रॉल व अन्य जण उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय