जावेद अख्तरांनी पाकिस्तानात झालेल्या फैज फेस्टिव्हलमध्ये जो काही पाकिस्तान विरोधी सूर काढला त्यानं भारतातलं पब्लिक त्यांच्यावर भलतंच फिदा आहे. जेव्हा लाहोर मध्ये बसून पाकिस्तानची इज्जत काढली तेव्हा तिथल्या लोकांची काय रिअॅक्शन होती यावर आता जावेद अख्तरांनी भाष्य केलं आहे.काही दिवसांपूर्वी गीतकार जावेद अख्तर फैज फेस्टिव्हलसाठी लाहोर मध्ये होते. तिथे त्यांनी पाकिस्तानी लोकांसमोर 26/11ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण सांगितली आणि म्हटलं की दहशतवाद त्यांच्याच देशात आहे.
इव्हेंटमधील या व्हिडीओ क्लीपची हिंदुस्थानात सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. यामुळे कंगनानं देखील जुने वाद मिटवत जावेद अख्तरांना सपोर्ट केला.
भारतीय गीतकार जावेद अख्तर यांनी लाहोरमध्ये बसून पाकिस्तान विरोधात जे म्हटलं त्यामुळे भारतातील लोकं तर भलतेच खूश झालेयत. आता खुद्द अख्तरांनी यावर पाकिस्तानातील लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या हे सांगितलं आहे.
एका मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले,”माझ्या त्या वक्तव्यावर सबंध उपस्थित पाकिस्तानी नागरिकांनी तेव्हा टाळ्या वाजवल्या. सगळेच माझ्याशी सहमत होते. खूप लोक आहेत ज्यांनी भारताची प्रशंसा केली,आपल्यासोबत त्यांना नातेसंबंध चांगले करायची मनोकामना आहे”.
जावेद अख्तर असं देखील म्हणाले की पाकिस्तानची आर्मी,पाकिस्तानी लोक,तिथली संरचना सगळं वेगळं आहे आपल्यापेक्षा.
जावेद यांना विचारलं गेलं होतं की,’ भारत आणि पाकिस्तानमधील संबंधावर भाष्य करण्याची ही योग्य वेळ आहे का? यासाठी कुठल्या मध्यस्थीची गरज आहे का?’
त्यांनी उत्तर दिलं होतं की,”माझ्यात या प्रश्नाचं उत्तर देण्याची योग्यता नाही. जे लोक सत्तेत आहेत,ज्यांच्याकडे पावर आहे,त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की काय होत आहे,काय स्थिती आहे,आणि याकडे कसं पहायला हवं. जे देश चालवतात ते चांगल्या पद्धतीनं समजू शकतात. याविषयी माझं ज्ञान तेवढं नाही”.
” भारतातील लोकांना पाकिस्तानातील लोकांविषयी खूप कमी माहित आहे. तसंच पाकिस्तानातील लोकांचे असेल..त्यांना देखील भारतातील लोक कमी माहित असतील”.
व्हायरल क्लीपमध्ये जावेद अख्तर दहशतवाद्यांना संरक्षण देण्यावरनं पाकिस्तानवर सडकून टीका करताना दिसत आहेत. त्यांनी मुंबईत झालेल्या २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत अतिरेकी पाकिस्तानात मोकळे फिरत आहेत. आणि जे खरे आहे ते सांगितले किंवा यासंदर्भात भारतानं तक्रार केली तर त्यावर पाकिस्ताला वाईट वाटायला नको, असं देखील म्हटलं आहे.