Saturday, April 20, 2024
Homeजिल्हाहिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन !

हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन !

शंकराचार्य यांनी वयाच्या 99 व्या वर्षी नरसिंगपूर येथे अखेरचा श्वास घेतला. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते. मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात त्यांचा जन्म झाला होता वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी धार्मिक कार्यासाठी घर सोडले.

परमहंसी गंगा आश्रम झोतेश्वर जिल्हा नरसिंगपूर येथे आज दुपारी 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन शंकराचार्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. देशात आंदोलने झाली, गांधीजींनी 1942 मध्ये भारत छोडोचा नारा दिला, तेव्हा स्वामींनीही स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यावेळी ते 19 वर्षांचे होते. या वयात ते ‘क्रांतिकारक साधू’ म्हणून ओळखले गेले. यादरम्यान त्यांनी नऊ महिने वाराणसीच्या तुरुंगात आणि सहा महिने मध्य प्रदेशच्या तुरुंगात काढले. राम मंदिराच्या उभारणीसाठीही त्यांनी प्रदीर्घ कायदेशीर लढाही लढले. काही दिवसांपूर्वीच स्वामीजींचा 99 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय