Home पुणे - पिंपरी चिंचवड Israel-Hamas war : भारत सरकारचे ‘ऑपरेशन अजय’ सुरू,230 भारतीय सुखरूप दाखल

Israel-Hamas war : भारत सरकारचे ‘ऑपरेशन अजय’ सुरू,230 भारतीय सुखरूप दाखल

हवाई दला सह एअर इंडियाची संयुक्त मोहीम

नवी दिल्ली :
इस्रायली सैन्य आणि हमास दहशतवादी यांच्यातील युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. वाढत्या संघर्षात इस्रायलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने गुरुवारी तेल अवीव येथे पहिले चार्टर विमान पाठवले. ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत शुक्रवारी सुमारे 230 भारतीयांची पहिली तुकडी दिल्ली विमानतळावर सुखरूप आली आहे.


परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले की, एअर इंडियाचे बी-787 विमान दिल्ली विमानतळावरून संध्याकाळी 5 वाजता मिशनसाठी निघाले. इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षित आणण्यासाठीभारतीय हवाई दलाने (IAF) त्यांचे विमाने स्टँडबायवर ठेवली आहेत, ऑपरेशन अजय’ अंतर्गत 18 ऑक्टोबरपर्यंत इस्रायलमध्ये अडकलेल्या 18,000 नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारतसरकारने योजना तयार केली आहे. भारतीय हवाई दलाची बोइंग ग्लोब मास्टर C- 17 आणि IL-76 हेवी-लिफ्ट ट्रान्सपोर्ट विमाने आणि C-130J सुपर हरक्यूलस स्पेशल ऑपरेशन्स विमानांचा ‘ऑपरेशन अजय’ मोहिमेसाठी वापर करण्यात येणार आहे.इसरायलमध्ये भारतीय दुतावासात भारतीयांची नोंदणी गुरुवारपासून सुरू झाली आहे.


दरम्यान एअर इंडीयाने इस्राइलच्या तेल अवीवला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या आपल्या फ्लाईट संदर्भात मोठी घोषणा केली आहे. एअर लाईनने सांगितले आहे की, एअर इंडीयाचे प्रवासी 31 ऑक्टोबरपर्यंत आपल्या फ्लाईटला कोणत्याही अतिरिक्त चार्जेस शिवाय वेळापत्रक रिशेड्यूल करु शकतात. इसरायल व पॅलेस्टाईन या दोन्ही देशांमध्ये भारतीय नागरिक शिक्षण,व्यवसाय निमित्त जात येत असतात. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर मार्च 2022 मधील सुरू ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत 76 फ्लाइट्समधून आपल्या 16000 हून अधिक भारतीय नागरिकांना सुखरूप परत आणले होते.

Exit mobile version