नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी रात्री इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या 18व्या हंगामाच्या पुनरारंभाची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सीमेवरील तणावामुळे 9 मे रोजी एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा आता 17 मे 2025 पासून पुन्हा सुरू होणार आहे. (IPL New Schedule) नवीन वेळापत्रकानुसार, उर्वरित 17 सामन्यांचे आयोजन सहा शहरांमध्ये होणार असून, अंतिम सामना 3 जून 2025 रोजी खेळवला जाईल. (हेही वाचा : नाशिक : वादळी पावसात झाड कोसळून दोन जिवलग मित्रांचा मृत्यू)
आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्च 2025 रोजी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (आरसीबी) यांच्यातील सामन्याने सुरू झाला होता. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीला भारत-पाकिस्तान सीमेवर वाढलेल्या तणावामुळे आणि पाहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा कारणास्तव स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली. 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर बीसीसीआयने सरकार आणि सुरक्षा यंत्रणांशी सविस्तर चर्चा करून स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती, चाहत्यांना भावनिक पत्र)
बीसीसीआयने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, “सरकार आणि सुरक्षा यंत्रणांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर आणि सर्व प्रमुख भागधारकांच्या सहमतीने, बीसीसीआयने आयपीएल 2025 चा उर्वरित हंगाम पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 17 सामने सहा ठिकाणी खेळवले जातील, ज्याची सुरुवात 17 मे 2025 पासून होईल आणि अंतिम सामना 3 जून 2025 रोजी होईल.” (हेही वाचा : ब्रेकिंग : लाडक्या बहिणींना 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार ; अजित पवार यांची मोठी घोषणा)
नवीन वेळापत्रक आणि ठिकाणे | IPL New Schedule
नवीन वेळापत्रकानुसार, उर्वरित 17 सामने बेंगलुरू, जयपूर, दिल्ली, लखनौ, मुंबई आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये खेळवले जातील. यापैकी 13 सामने लीग स्टेजचे असतील, तर चार सामने प्लेऑफचे असतील. प्लेऑफच्या सामन्यांची ठिकाणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत, परंतु त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
- क्वालिफायर 1 : 29 मे 2025
- एलिमिनेटर : 30 मे 2025
- क्वालिफायर 2 : 1 जून 2025
- अंतिम सामना : 3 जून 2025
(हेही वाचा : मोठी बातमी : 100 दहशतवादी ठार, 9 छावण्या उद्ध्वस्त; भारतीय लष्कराची माहिती)