Monday, June 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Alandi : आळंदीतील राजे शिवराय विद्यालयाचा १०० टक्के निकाल

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजे शिवराय विद्यालय इंद्रायणी नगर या प्रशालेचा इयत्ता दहावी बोर्ड निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक, संस्थेवर परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Alandi)

शाळेचा निकाल १०० टक्के निकाल लागला असून यात पहिले तीन क्रमांक पुढील प्रमाणे. गुणवंत मुलांत विद्यालयाचे पहिले तीन मानकरी अनुक्रमे वैष्णवी भिसे, काव्य कांबळे, हर्षदा कोंडके यांचा समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था व विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. संस्तेचे वतीने अध्यक्ष गोकुळ गायकवाड, सचिव लहू कांबळे, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आळंदी या विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कांबळे, पर्यवेक्षक कृष्णा खुणे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्याथ्यांचे अभिनंदन केले. (Alandi)

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा ८८ टक्के निकाल
बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आळंदी या दुसर्या युनिट मधील शाळेचा इयत्ता दहावीचे बोर्ड परीक्षेचा निकाल ८८ टक्के लागला असून सर्व उत्तीर्ण मुलांचे संस्थेचे वतीने अभिंनदन करण्यात आले. या विद्यालयाचे पहिले तीन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात अनुक्रमे स्नेहल गर्जे (प्रथम), रोहन चपटे (द्वितीय), श्रावणी हिरे (तृतीय) यांचा समावेश आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे तर्फे अभिनंदन करण्यात आले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles