Monday, June 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : किशोर थोरात यांची महापोलीस मित्र संघच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड

पिंपरी चिंचवड – महापोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर अण्णासाहेब थोरात यांची नुकतीच निवड करण्यात असून त्यांचे नियुक्ती पत्र महापोलीस मित्र संघ चे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अतुल बिराजदार व महाराष्ट्र राज्य संघटक अमोल भोसले यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथे देण्यात आले. (PCMC)

महापोलीस मित्र संघ,महाराष्ट्र राज्य ही संस्था पोलिसांच्या बरोबर विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन समाजातील विविध प्रश्न सोडविण्याच्या हेतूने काम करते व संस्थेच्या बरोबर सामाजिक काम करणारी व्यक्तिमत्व हे नेहमीच शोधून काढावी लागतात व तरच संस्था मोठ्या पातळीवर काम करत असते म्हणून नुकत्याच झालेल्या पुणे येथील आढावा बैठक मध्ये सामाजिक कार्यकर्ते किशोर थोरात यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अनिता लष्करे यांनी संस्थेच्या तुळजापूर येथील मुख्य कार्यालयातून किशोर थोरात यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या तर संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामभैया जाधव व मार्गदर्शक लक्ष्मण पवार यांनीही शुभेच्छा दिल्या. (PCMC)

त्याच बरोबर उद्योजक राजेंद्र साळुंके यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी तर गणेश कोकणे यांची जुन्नर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या आढावा बैठकी साठी महाराष्ट्र राज्य संघटक अमोल भोसले, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अतुल बिराजदार, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष हर्षदा वाडेकर, पुणे जिल्हा सचिव चंद्रकांत गोटमुकले, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गिरीश सातपुते, पुणे जिल्हा सह सचिव वैजनाथ सोळंके, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रवींद्र बेल्हेकर, पुरंदर तालुका उपाध्यक्ष वैभव धुमाळ आदी उपस्थित होते. (PCMC)

महापोलीस मित्र संघच्या माध्यमातून पोलिसांच्या बरोबर काम करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन व त्यांची प्रतिमा वाढण्यासाठी निश्चितच आपण काम करणार असून विविध सामाजिक उपक्रम राबवून देश हिताचे कार्य पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या हातून करणार असल्याचे नव निर्वाचित पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सांगितले.

किशोर थोरात हे गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक ,शैक्षणिक, अध्यात्म व आरोग्य या क्षेत्रांत काम करत असून त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रा बाहेरील राज्यातील सामाजिक संस्थांनी त्यांना सुमारे २५ पुरस्कार दिलेले आहेत.
यावर बोलताना किशोर थोरात यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले तर कोणतेही सामाजिक काम करण्यासाठी मी पणा,गर्व, अपेक्षा बाजूला ठेऊन निस्वार्थ भावनेने जर निरंतर, सातत्यपूर्ण आणि योग्य दिशेने काम केले तर नक्कीच ध्येय गाठून सामाजिक कार्याची एक उंची गाठता येते, आपला जन्म हा समाज सेवेसाठीच झालेला आहे असे समजून प्रत्येकाने काम केले तर संपूर्ण देश हितासाठीच लोक काम करतील. (PCMC)

किशोर थोरात हे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या मानवाधिकार संस्थेचे गेले तीन वर्षांपासून पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत व त्यांनी विविध उपक्रम हे पोलिसांसोबत राबविलेले आहेत,तर थोरात यांचे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी अभिनंदन केले व पुढील कामास शुभेच्छा दिल्या.

किशोर थोरात यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने आनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्टचे अध्यक्ष दिगंबर थोरात, अध्यात्मिक गुरू संजय तळोले , सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके व स्वामी सेवेकरी शरद बिडवे यांनी सत्कार केला तर परिसरातील विविध स्तरातून किशोर थोरात यांचे कौतुक केले जात आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles