पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.30- भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने कायझेन स्पर्धा 2024 यामध्ये 58 कंपन्यांतील 469 स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकूण 194 नामांकन प्राप्त झाले.
या स्पर्धेचे उद्घाटन एव्हीपी फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सचे जितेंद्र राणा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी लर्निंग अॅण्ड ट्रेनिंग विभागाचे प्रमुख पी.एम. साजीकुमार, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, कौन्सिल सदस्य अनंत क्षीरसागर, विजया रूमाले उपस्थित होते.
समारोप सत्रात प्रमुख पाहुणे कमिन्स इंडिया लिमिटेड (कोथरूड) प्लांट मॅनेजर राजेंद्र कुलकर्णी, प्रिमियम ट्रान्समिशन प्रा.लि.चे कार्पोरेट क्वॉलिटी अॅण्ड इएचएस प्रमुख अजय कुमार यांचा क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे यांच्या हस्ते भव्य स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभ राजेंद्र कुलकर्णी, अजय कुमार, सतीश काळोखे, अनंत क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक प्रदान केले.
या स्पर्धेत 130 केस स्टडीज 41 पोस्टर्स आणि 23 घोषणा भीत्तीपत्र यांचा समावेश होता. केस स्टडीचे सादरीकरण कायझेन एसएमईडी, पोकायोके आणि लो कॉस्ट अॅटोमेशन स्पर्धेत विविध कंपन्यांतील संघांनी त्यांची गुणवत्ता सुधार यशोगाथा, पोस्टर्स आणि घोषणा भीत्तीपत्र सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रूमाले यांनी केले तर, आयोजन प्रशांत बोराटे व चंद्रशेखर रूमाले यांनी केले.
स्पर्धेतील सहभागी कंपन्या एबीबी-नाशिक, अभिजीत प्लास्टिक इंडिया प्रा.लि., ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अँड असेंबली लि., बेलरिस युनिट क्रमांक : 16 वाळूंज औरंगाबाद, बेलरिस इंडस्ट्रीज लि.-रांजणगाव, बॉश चेसिस सिस्टम्स इंडिया प्रा.लि. क्लासिक इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट्स लि., कमिन्स टेक्नॉलॉजी प्रा.लि.-फलटण, पीसीपी 2, कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजी इंडियन प्रा.लि.-अहमदनगर, कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजी इंडियन प्रा.लि.-रांजणगाव, कमिन्स इंडिया लि.-कोथरूड, डाना स्पायसर, एन्प्रो इंडस्ट्रीज प्रा.लि., फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स (आय) प्रा.लि., फोर्ब्स मार्शल प्रा.लि., गॅब्रिएल इंडिया -चाकण, जीकेएन सिंटर मेटल प्रा.लि., ग्रिंडवेल नॉर्टन लि., आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि., केएसपीजी ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि., लुमॅक्स कोर्नागलिया ऑटो टेक्नॉलॉजी लि., मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड-सुरक्षा प्रणाली, मिंडा कॉर्पोरेशन लि. डब्ल्यूएचडी, पुणे, युनिट-2, मिंडा कॉर्पोरेशन लि.-मुरबाड, मिंडा कॉर्पोरेशन लि. डब्ल्यूएचडी, पुणे युनिट-1, मिंडा इन्फेक प्रा.लि., मोंडेलेझ इंडिया फूड्स प्रा.लि., नील मेटल प्रॉडक्ट्स लि., प्रभा इंजिनीअरिंग प्रा.लि., प्रीमियम ट्रान्समिशन प्रा.लि., क्युएच तालब्रोस प्रा.लि., सेंट-गोबेन इंडिया प्रा.लि., सिंडलर इंडिया प्रा.लि., सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन प्रा.लि.युनिट-3, एसकेएच शीट मेटल कॉम्पोनंट्स प्रा.लि., सुब्रोस लि., सुजन कॉन्टीटेक एव्हीएस प्रा.लि., सुप्रीम ट्रेऑन प्रा.लि., सुरीन ऑटोमोटिव्ह प्रा.लि., तालब्रोस अॅटोमॅटीव्ह कंपोनंट्स लि., टाटा ऑटोकॉम्प-एअर इंटरनॅशनल भोसरी, मोशी प्लांट, टाटा ऑटोकॉम्प-कंपोझिट विभाग, टाटा ऑटोकॉम्प गोशन ग्रुप, टाटा ऑटोकॉम्प गोशन ग्रीन एनर्जी सोल्युशन्स-अहमदाबाद, टाटा ऑटोकॉम्प जीवाय बॅटरीज् प्रा.लि., टाटा ऑटोकॉम्प हेंड्रीक्सन सस्पेंशन, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम् आयपीडी विभाग, टाटा कमिन्स प्रा.लि.-फलटण प्लांट, टाटा मोटर्स-व्यावसायिक वाहन, टाटा मोटर्स-ईआरसी, टाटा टोयो रेडिएटर लि., टेनेको क्लीन एअर इंडिया प्रा.लि., वॉलमॉन्ट स्ट्रक्चर्स प्रा.लि., विशाय कंपोनंट्स इं.प्रा.लि.लोणी-काळभोर पुणे, विशाय सेमीकंडक्टर इं.प्रा.लि., यिनलून एडीएम इंडिया प्रा.लि., झेड एफ प्रा.लि. यांनी सहभाग नोंदविला.