Monday, December 23, 2024
Homeराजकारणविक्रमगड तालुक्यात श्रमजीवी संघटनेला रामराम ठोकून १०० कार्यकर्त्यांचा लाल बावट्यात प्रवेश

विक्रमगड तालुक्यात श्रमजीवी संघटनेला रामराम ठोकून १०० कार्यकर्त्यांचा लाल बावट्यात प्रवेश

पालघर : पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील उपराळे गावात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीर सभेत श्रमजीवी संघटनेच्या १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी लाल बावट्यात प्रवेश केला.

कैलास तुंबडा, विलास झोप, हिराबाई जाधव, विजय पाटील आणि सुनीता मोहंडकर या प्रमुखांसह १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.त्यांचे लाल स्कार्फ व लाल टोप्या घालून पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केले. 

माकपचे राज्य कमिटी सदस्य आणि विक्रमगड तालुका सचिव किरण गहला हे गेले तीन महिने कैलास तुंबडा यांच्या नेतृत्वात हा प्रवेश झाला असल्याचे माकपने म्हटले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजा गहला होते तर जाहीर सभेस डॉ. अशोक ढवळे, बारक्या मांगात, मरियम ढवळे, आमदार विनोद निकोले, किरण गहला, लक्ष्मण डोंबरे, नंदू हाडळ, चंद्रकांत घोरखाना, भरत वळंबा, अमृत भावर, चिंतू कानल, विलास गहला, भास्कर म्हसे, दत्तू खराड यांनी संबोधित केले.

संबंधित लेख

लोकप्रिय