मुंबई : राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली आहे. या योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरु झाली असून, महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे जमा होणार आहेत.
सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 15 जुलै होती. परंतु अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज पूर्ण झाले आहेत, त्यांची तात्पुरती पात्र लाभार्थ्यांची यादी 16 जुलैला जाहीर होणार आहे. तसेच, 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर, 14 ऑगस्टला या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. साधारणत: 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल.
ऑगस्ट महिन्यानंतर, दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana


हेही वाचा :
धक्कादायक : नोकरीसाठी तरूणांची तोबा गर्दी, एकमेकांना धक्काबुक्की ; रेलिंगही तुटले
ब्रेकिंग : १० वी, १२ वी परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत महत्वाची बातमी
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा