पुणे, दि. ११: समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांसाठी, पारलिंगी व तृतीयपंथी नागरिकांसाठी (Transgender) राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी पारलिंगी तथा तृतीयपंथी व्यक्तींची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर (Brand Ambassadors) म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुक तृतीयपंथीय नागरिकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रॅण्ड ॲम्बेसेडरच्या नियुक्तीसाठी इच्छुक पारलिंगी, तृतीयपंथी व्यक्तींनी (Transgender) आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र, अभिनयाचे व्हिडीओ आणि आवश्यक कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे ६ येथील कार्यालयात उपस्थित राहून अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.


हेही वाचा :
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!
Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण