Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडगुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा...

गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेट जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी चालकांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा निर्णय दोन दिवसांत मागे घ्या अन्यथा शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिला.

देशभक्तीचे ढोंग करणारे भाजपचे नेते दुसरीकडे देशविघातक कृत्यात सहभागी असलेल्या लोकांकडे शहर सोपविणार असल्याने पिंपरी चिंचवडकरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच या कपंनीशी संबंधीत आजी- माजी संचालक हे हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असून झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतील गुन्हेगारी कारवायांमध्ये ते गुंतलेले आहेत, असेही गव्हाणे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व गुन्ह्यांचा आम्ही पर्दाफाश कऱणार आहोत, असेही गव्हाणे यांनी सांगितले. शहरातील जनतेनेही या विषयावर रस्त्यावर उतरावे आणि आपले शहर या गुन्हेगारांपासून वाचवावे असे आवाहन गव्हाणे यांनी केले आहे.

स्मार्ट सिटी समिती व्यवस्थापनाने शुक्रवारच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध डावलून या विषयावर निर्णय घेतला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आयुक्त शेखर सिंह यांना भेटले असता, चौकशी करून पुढील निर्णय करू, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात बैठकित त्यावर शिक्कामोर्तब केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि संबंधीत कंपनीचे सर्वेसर्वा कशाप्रकारे पाकिस्तान आणि दुबई मध्ये गुन्हेगारी टोळीशी संपर्कात आहेत ते पुराव्यासह दाखवून दिले. त्यानंतरही एका बड्या नेत्यांच्या दबावाखाली तो विषय मंजूर केल्याने नागरिकांमध्येही संतप्त प्रतिक्रीया आहे. 

अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे की, मे. सुयोग टेलिमॅटिक्स लिमिटेड – मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या भागीदार कंपनीने निविदा भरली आहे. त्याती मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि.मध्ये संचालक असलेले रियाझ अब्लूज अजिज शेख, संजय सिन्हा, ड्वेन मायकेल परेरा हे संचालक होते. 

रियाझ शेख आणि ड्वेन परेरा यांच्यावर अहमदाबाद येथे बनावट टेलिफोन एक्सचेंज चालविण्याच्या प्रकऱणात गुन्हा दाखल आहे. या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधीतांकडेच पिंपरी चिंचवड शहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविण्यात येणार आहे. शहरातील एक बडा नेता आणि महापालिका प्रशासनाचाही त्यासाठी बराच आग्रह असल्याने संशय बळावला आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांच्या हातात शहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविले तर आगामी काळात खूप मोठा धोका संभवतो.

शहराला नेमका धोका असा आहे ?

केबल इंटरनेटचे नेटवर्क अशा गुन्हेगारांकडे गेले तर, उद्या डेटा चोरी होऊ शकते. दुबई किंवा पाकिस्तानातून खंडणी उकळण्यासाठी गुन्हेगारांनी फोन केला तरी ते सापडणार नाही. महिला आणि मुलिंच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जातीय तेढ निर्माण कऱण्यासाठीही ही यंत्रणा वापरली जाऊ शकते इतकेच नाही तर अतिरेकी कारवायासुध्दा होऊ शकतात. शहरच नव्हे तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.

पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे ६०० किलोमीटर लांबीचे अंडरग्राऊंड केबल डक्ट तयार कऱण्यात आले. तत्कालिन महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी महापालिकेसाठी नवीन उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून हा प्रकल्प हाती घेतला होता. महापालिकेला त्यातून भरघोस उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अंडरग्राऊंड केबलसाठी विविध कंपन्यांकडून वारंवार होणाऱ्या रस्ते खोदाईलाही आळा बसणार आहे. डक्ट भाडेपट्ट्याने देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने सुमारे ३०० कोटी रुपयांची एक निविदा नुकतीच काढली होती.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय