नाशिक : एनडीसीसी बँक ची एसआयटी चौकशी तात्काळ करा, अशी मागणी नाशिक जिल्हा बँक वाचवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
एनडीसीसी बँक ची एसआयटी चौकशी भूमिका नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाशिक येथे मांडली आहे. महाराष्ट्र शासनाने चौकशी तात्काळ करून भ्रष्ट्राचार करून बँक लूट करणाऱ्यांना जेल मध्ये टाका. त्यांची संपत्ती जप्त करून विक्री करून नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक बँक वाचवावी. ठेवीदारांना ठेवी परत करून तसेच शेतकरी कर्जदारांना कर्जपुरवठा सुरळीत करून जिल्हा बँक पालकमंत्री महोदयांनी वाचवावी असे आवाहन नाशिक जिल्हा बँक वाचवा – सहकार वाचवा चळवळ नाशिक जिल्ह्या चे निमंत्रक राजू देसले समितीचे शांताराम ठाकरे, संपतराव वक्ते, संपत जाधव, आदींनी केले आहे.