मुंबई, (वर्षा चव्हाण) : महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षा आणि चोरीस प्रतिबंध करण्यासाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२५ पासून या नियमाची अंमलबजावणी होईल. या नियमाचे पालन न केल्यास वाहनमालकांना ₹10,000 पर्यंत दंड भरावा लागू शकतो.
HSRP म्हणजे काय?
HSRP नंबर प्लेट विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून तयार केल्या जातात. त्यावर परावर्तित रंगांचा वापर करण्यात आला असून, प्रकाशात या प्लेट्स स्पष्ट दिसतात. यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहनांची सहज ओळख पटते.
या प्लेट्सवर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो आणि वाहनांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या रंगाचा वापर केला जातो. पांढऱ्या, पिवळ्या आणि हिरव्या रंगात तयार करण्यात आलेल्या या प्लेट्सवर निळ्या रंगाचे अशोक चक्र आणि “इंडिया” असे मुद्रित केलेले असते.
HSRP नसेल तर काय होणार?
मोटार वाहन कायद्यांतर्गत ₹10,000 दंडाचा सामना करावा लागेल.
वाहन नोंदणी आणि पत्ता बदल यांसारख्या सेवा थांबवण्यात येतील.
चोरी झालेली वाहने शोधण्यात अडथळे येतील.
HSRP बसवण्यासाठीचा खर्च:
दुचाकी/ट्रॅक्टर: ₹450
तीनचाकी: ₹500
प्रवासी वाहन: ₹745
HSRP बसवायचे कुठे?
वाहन तपशीलांची पडताळणी करून अधिकृत आरटीओ एजन्सीकडूनच HSRP प्लेट्स बसवल्या जातील.
महत्त्वाच्या तारखा:
२०२९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांवरही HSRP बसवणे अनिवार्य आहे.
३१ मार्च २०२५ पर्यंत सर्व वाहनांवर HSRP बसवणे आवश्यक आहे.
१ एप्रिल २०२५ पासून नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू होईल.
HSRP उपक्रमाचा उद्देश:
वाहनांची सुरक्षितता वाढवणे आणि चोरीस प्रतिबंध घालणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी HSRP बसवून जबाबदार नागरिक असल्याचे दाखवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : आज महायुती सरकारच्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी
ब्रेकिंग : …म्हणून अल्लू अर्जुनला जेलमध्ये काढावी लागली रात्र
खुशखबर : लाडकी बहीण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, महत्वाची माहिती समोर
लोकसभेत प्रियांका गांधी यांची मोदी सरकार जोरदार टीका, राजा वेश बदलतो…
काश्मीर मध्ये मायनस तापमान, उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम
मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास