Thursday, December 12, 2024
Homeशिक्षणअंतिम वर्षाची परिक्षा होण्याची शक्यता; युजीसीच्या नव्या सुचना जारी

अंतिम वर्षाची परिक्षा होण्याची शक्यता; युजीसीच्या नव्या सुचना जारी

(नवी दिल्ली) :- विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी / पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.  निकाल जाहीर करण्यासाठी कोणत्याही संभाव्य मार्गाने परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेतल्या पाहिजेत, असे आयोगाने नमूद केले आहे.

     राजस्थानसह ओरिसा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र राज्याने पदवीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना मान्यता देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने उच्च शिक्षण सचिवांना पत्र लिहिले आहे. महाविद्यालयांचे निकाल तयार करण्यासाठी परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

     विद्यापीठ अनुदान आयोगाने शेवटच्या वर्षाच्या परिक्षेबाबत अजून कोणतीही ठोस भुमिका घेतलेली नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. गेले कितेक दिवस विद्यार्थी चिंतेने ग्रासले असताना आता नवा संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यापीठ, महाविद्यालये, आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या किंवा सेमेस्टर परीक्षांचे नवीन मार्गदर्शक तत्वे आज विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आपल्या वेबसाईटवर जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे, यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे येण्यापूर्वीच अनेक विद्यापीठांनी त्यांच्या पातळीवर परीक्षांचा निर्णय घेतला आहे.  

     आता परिक्षा कशा होणार ? या नव्या चिंतेत टाकणार निर्णय असून आता विद्यापीठांना युजीसीच्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे परिक्षा घ्याव्या लागणार आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय