Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आंदोलक कुस्तीपटूंना केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन; अमित शहांनी केली “ही” विनंती..

नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना लैंगिक शोषणप्रकरणी तत्काळ अटक करावी म्हणून गेले दोन महिने आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना शनिवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरातून दबाव आल्यानंतर वेळ दिला आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

---Advertisement---

खाप पंचायतने केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर ही बैठक झाल्याचे समजते. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत कार्य चर्चा झाली याबाबत जास्त माहिती मिळू शकली नाही. मात्र, या आश्वासनानंतर आंदोलक कुस्तीपटूंनी खाप पंचायतीला कोणताही मोठा निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली. त्यानुसार खाप पंचायतींनी आपली बैठक पुढे ढकलली आहे.

कुस्तीपटूंच्या बाजूने उभे राहिलेल्या खाप पंचायतींनी केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम देताना बृजभूषण यांच्या अटकेची मागणी केली होती. केंद्र सरकारने या अल्टिमेटमला गांभीर्याने घेत शनिवारी रात्री त्यांची बाजू ऐकली. याप्रकरणी मौन बाळगणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचा भेदभाव वा अन्याय केला जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.

---Advertisement---

 हे ही वाचा :

निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles