मुंबई : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर सांगलीत भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका करत, “त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना?” अशी पोस्ट सोशल मीडियावर केली.
संभाजी भिडे (Sambhaji Bhide) सांगलीत एका धारकऱ्याच्या घरी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमानंतर साडेदहा ते अकराच्या सुमारास परतत असताना रस्त्यावर एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने भिडे यांच्या डाव्या पायाला चावा घेतला, ज्यामुळे त्यांच्या पायाला जखम झाली. भिडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी कुत्र्याला हुसकावून लावले आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर भिडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. (हेही वाचा – संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, रूग्णालयात उपचार सुरू)
Sambhaji Bhide यांच्यावर अमोल मिटकरी काय म्हणाले ?
संभाजी भिडेंना कुत्रा चावल्याची घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. यावर अनेकांनी प्रतिक्रीया दिली. तर काहींंनी उपहासात्मक टीका केली. अशी एक टीका अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. मिटकरी यांनी त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? असे म्हणत पुढे …..जो कुणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का? असे संभाजी भिडेंचे नाव न घेता ट्वीट केले आहे. (हेही वाचा – धक्कादायक : दोन मित्रांची एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या)
एसआयटी लावून चौकशी करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘कुत्र्याला कुठून दुर्बुधी सुचली…कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही. आता कुठला कुत्रा पोलीस शोधत आहेत, या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला, यासंदर्भात खरंतर एसआयटी वैगरे लावून चौकशी केली पाहिजे’, अस म्हणत वडेट्टीवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)
अजित पवार यांची कृती चर्चेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील पत्रकारांनी भिडे यांना कुत्रा चावल्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिथे एकच हशा झाला अजित पवार देखील हसून निघून गेले. त्यामुळे अजित पवार यांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (हेही वाचा – लाडक्या बहीणींना धक्का ; आता 1500 नव्हे तर फक्त 500 रुपयेच मिळणार)