Tuesday, January 21, 2025

“हिचा माज असाच राहणार” ! प्राजक्ता माळी

पुणे : गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या मराठी सिनेइंडस्ट्रीत ‘रानबाजार’ या वेबसीरिजचे तीन एपिसोड रिलीज झालेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहेत.

या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी  आणि तेजस्विनी पंडित  मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. यातील त्यांचा बोल्ड अंदाज खूप चर्चेत आला आहे. यामुळे वेबसीरिजमधील बोल्ड दृश्यांमुळे प्राजक्ता माळीला ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो आहे,

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात रानबाजारमधील तिच्या भूमिकेतील एक फोटो शेअर केला आहे. हिची भाषा आणि हिचा माज,तसाच राहील… काल, उद्या आणि आज ! प्राजक्ता माळी As रत्ना असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. एकच नंबर, मस्त आहे webseries ,हो खुपच मस्त अभिनय केला तु अशा कमेंट्स तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत. . तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली असून ती व्हायरल होत आहे.

कंगना रणौतचा बिग बजेट ‘धाकड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला !

विशेष लेख : जागतिक चहा दिवस !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles