Thursday, September 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडश्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

पिंपरी चिंचवड, १३ जुलै : शिवतेजनगर, चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी १५० गुणवंत विदयार्थी आणि गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर होते.

यावेळी शाहू कॉलेजचे प्राचार्य जितेंद्र होले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोटरी क्लब, आकुर्डीच्या अध्यक्षा मृणालिनी कुलकर्णी, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, पुणे जिल्हाध्यक्ष किशोर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक आणि माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राध्यापक हरिणारायन शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सारिका रिकामे यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीस्वामी समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना तोडकर यांनी केले. दहा हजार भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय