Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Perambalur: संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद 

Perambalur : जमीन, संपत्तीच्या मोहात अनेकांना नात्याचा विसर पडतो. काळ बदलत गेला तसा नात्यातील जिव्हाळाही कमी झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. पैशाच्या वादातून, जमिनीच्या वादातून रक्ताची नातीच जिवावर उठल्याची अनेक घटना ऐकायला, वाचायला मिळतात. तमिळनाडूमधून अशीच एक संतापजनक अन् मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या पेरांबलूर (Perambalur) जिल्ह्यात पोटच्या लेकानेच जन्मदात्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

---Advertisement---

तामिळनाडूमध्ये 42 वर्षांच्या मुलाने आपल्या वृद्ध वडिलांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. तामिळनाडूच्या पेरांबलूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संपत्तीच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, वृद्ध पिता घराबाहेर सोफ्यावर बसल्याचे दिसत आहे. अचानक त्याठिकाणी त्यांचा मुलगा येतो अन् अत्यंत क्रुरपणे आपल्या जन्मदात्याला मारायला सुरूवात करतो. धक्कादायक म्हणजे तो वडिलांच्या पोटात एक जोराची लाथही घालतो, ज्यानंतर ते जाग्यावर कोसळतात. काही वेळाने तरुणाला घरातील इतर व्यक्ती अडवतात.

---Advertisement---

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संतोष नावाच्या आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३ आणि ३२४ यासह विविध आरोपांनुसार अटक केली आहे. संतोषला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणाला कडक शिक्षेची मागणी केली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त

SC, ST, OBC आरक्षण संपुष्टात आणणार अमित शहांचा व्हिडिओ व्हायरल, वाचा काय आहे सत्यता !

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !

मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles