मुंबई, दि. १२ : एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना (teachers) एकच निवड वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भातील शासन सकारात्मक आहे. यासंदर्भातील अहवाल केंद्र शासनाकडून मागविण्यात आला आहे. अहवालाअंती कार्यवाही करण्यात येईल. तसेच आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, त्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यातील २० टक्के शिक्षकांनाच (teachers) निवड वेतनश्रेणी देण्याची अट ठेवल्याबाबत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर बोलत होते.
यावेळी सदस्य निलय नाईक, केशव दराडे, विक्रम काळे, ज.मो.अभ्यंकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.
मंत्री केसरकर म्हणाले की, राज्यात एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षे पूर्ण झालेल्या २० टक्के शिक्षकांना निवड वेतनश्रेणी लागू करण्यात येत आहे. मात्र सरसकट एकाच वेतनश्रेणीतील सर्व शिक्षकांना समान निवड वेतनश्रेणी देण्याबाबत केंद्र सरकारकडे अहवाल मागविण्यात आला आहे. यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे. तसेच, आश्वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिली. त्याप्रमाणे शिक्षकांनाही द्यावी यासदंर्भात बक्षी समितीने निर्णय लागू केल्याने याबाबतचा सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली.


हेही वाचा :
धक्कादायक : बागेतील आंबे खाल्ल्याने अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल