Home पुणे - पिंपरी चिंचवड सरकारी ॲप निर्माण करावे,ग्राहक व रिक्षाचालकांचा फायदा – बाबा कांबळे

सरकारी ॲप निर्माण करावे,ग्राहक व रिक्षाचालकांचा फायदा – बाबा कांबळे

पुणे शहरातील सर्व प्रमुख संघटनांची एक मताने ठराव मंजूर

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर
:पुणे आरटीओ च्या ॲप वतीने नुकतेच रिक्षा वाहनासाठी वापरण्यात येणारा ओला उबेर रॅपिडो या कंपनीच्या मोबाईल साठीची परवानगी नाकारली असून, चार चाकी वाहनांना परवानगी नाकारण्याबद्दल राज्य सरकारला सूचना केली आहे, यामुळे आता रिक्षासह चार चाकी वाहनातून होणारे ओला उबेर रॅपिडो या कंपनीची सेवा लवकरच बंद होऊ शकते,

यामुळे पुणे शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन रिक्षा चालकांसाठी व प्रवाशांसाठी मोबाईल टेक्नॉलॉजी अत्यंत उपयुक्त आहे, परंतु खाजगी आणि भांडवलदार कंपन्यामुळे रिक्षा चालकांचे आणि प्रवाशांचे देखील लूट होत आहे अक्षरशः भांडवलदार कंपन्या प्रवाशांकडून जास्त पैसे घेतात तर रिक्षा चालकांकडून देखील ४०% देखील कमिशन घेत आहेत, यामुळे सरकारने स्वतः मोबाईल ॲप निर्माण करून तो प्रवासी आणि रिक्षाचा सेवेमध्ये उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पुण्यातील सर्व रिक्षा संघटनेने केले असल्याची माहिती ऑल इंडिया ऑटो रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली.मोबाईल ॲप्लिकेशन बाबत निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीबाबत पुणे शहरातील सर्व संघटनांनी पुणे येथील महामाता रमाई स्मारक येथे बैठक आयोजित केली होती.

भाजप वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अंकुश नवले हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते या बैठकीत समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक व पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष किशोर चिंतामणी, आम आदमी पक्षाचे पुणे शहर संघटक एकनाथ ढोले, शिवनेरी रिक्षा संघटनेचे संस्थापक आबा बाबर, सावकाश रिक्षा संघटनेचे प्रदीप भालेराव, पुणे रिक्षा फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रकाश झाडे, रिक्षा फेडरेशन चे ज्येष्ठ नेते पोपटराव कांबळे, रिक्षा संघटनेचे ज्येष्ठ नेते असगर बेग, पंकज जैन, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे सदस्य गणेश रासने, शिवकल्याण रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ मारणे , श्री समर्थ रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ कडू,तुषार पवार, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख कार्याध्यक्ष विलास त्यांचे पाटील,आधी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version