हडपसर / डॉ. अतुल चौरे : ‘गुगल क्लासरूम-अ टूल फॉर टीचिंग अँड लर्निंग’ या विषयावर एस.एम.जोशी महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक प्राद्यापक डॉ. किशोर काकडे यांनी केले. या प्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.एकनाथ मुंढे यांनी सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी यांना गुगल क्लासरूमचा शैक्षणिक साधन म्हणून कसा वापर करावा याबाबतचे प्रशिक्षण दिले. तंत्रज्ञानाप्रमाणे आपणही आपल्यात बदल केला पाहिजे. तसेच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत वापर केला पाहिजे. असे विचार डॉ. एकनाथ मुंढे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस .एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात डिजिटल साक्षरता निर्माण करण्याची गरज आहे. सुत्रसंचालन प्रा. डॉ. विश्वास देशमुख यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा. फुलचंद कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य डॉ.संजय जडे, प्रा. इम्तियाज शेख, प्रा. नयना शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.