Friday, July 12, 2024
Homeजिल्हातुकाराम रोंगटे लिखित “आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हा ग्रंथ समाजात समतेचे मूल्य...

तुकाराम रोंगटे लिखित “आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हा ग्रंथ समाजात समतेचे मूल्य पेरणारा ठरणार

पुणे : डॉ. तुकाराम रोंगटे यांचा “आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हा वैचारिक ग्रंथ आजच्या घडीला आदिवासी समाजाला आणि आदिवासी तरूण वर्गाला प्रेरणा देणारा ठरणार आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासी समाजासाठी असलेले योगदान अधोरेखित करणारा आहे.

भारतीय राज्यघटनेत आदिवासींना ‘मूळनिवासी’ अथवा ‘आदिवासी’ असा दर्जा द्यायला हवा होता, तो न देता राज्यघटनेमध्ये आदिवासींना ‘अनुसूचित जमाती’ असे संबोधण्यात आले  असून या गोष्टीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरच कसे जबाबदार आहेत असे सांगणाऱ्या लोकांचे डोळे उघडणारा आणि वास्तव समाजाला समजावून देणारा असा अगळा वेगळा ग्रंथ डॉ. रोंगटे यांनी लिहिला असून, या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा दिनाक 13 डिसेंबर 2021 रोजी ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात’ आयोजित करण्यात आला आहे.

ह्या ग्रंथाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे गैरसमज दूर होऊन ते राष्ट्रीय नेते होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे होते, हे सिध्द होणार आहे. ‘शेटजी आणि भटजी या संयुक्त शोषणसत्ताकाची अमानुषता या सर्वच भावंडांच्या ससंदर्भ लक्षात येत आहे.’ असे यशवंत मनोहर याचे मलपृष्ठा वरील विधान याची प्रचिती देणारे आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय