जुन्नर : जुन्नर तालुक्यातील जळवंडी, देवळे या परिसरात सकाळी १ गवा आढळून आला. हा गवा पाण्याच्या शोधात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थ राहुल घुटे हे शेताकडे गेले असता त्यांना देवळे येथील शिंदू डोह येथे सकाळी ८ वाजता गवा पाणी पिताना आढळून आला. हा गवा हिरडीकडून पुढे जळवंडीकडे गेल्याचे घूटे यांनी सांगितले. तसेच हा गवा दौड्या डोंगरावरून खाली उतरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाचा कहर : वीज पडून ३३ जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी शोक केला व्यक्त
गेल्या काही दिवसांपुर्वी जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पिंपरवाडी, आंबे, खिरेश्वर या परिसरात दोन गवे आढळून आले होते. ढाकोबा परिसरात दरवर्षी गवे येत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे, मात्र गवे आता देवळे आणि जळवंडी या परिसरात देखील आढळून येत अाहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी