Wednesday, July 3, 2024
Homeजुन्नरJunnar : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोलीपूर शाळेत शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकांची...

Junnar : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोलीपूर शाळेत शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकांची भेट

Junnar/ आनंद कांबळे : जुन्नर तालुक्यातील शिरोली (पूर) येथील जि.प प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य व दप्तर वाटप कार्यक्रम संपन्न झाला. ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवराम कोठारे होते. (Junnar)

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना आनंद कांबळे यांनी शालेय दप्तर देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केलं तर कोठारे यांनी गुरुवर्य कृष्णाराव अर्जुन केळुसकर व महाराष्ट्राचे शिल्पकार क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे आत्मचरित्र भेट देवून शिक्षकांचे स्वागत केलं. अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात नवव्या क्रमांकावर असणारा आमच्या शाळेचा आदर्श विद्यार्थी अथर्व भरत दिघे याचा सन्मान करण्यात आला.

देवराम कोठारे, विलास किरोते, दिलीप चिंचवडे, अशोक कारके, जोसेफ थॉमस यांच्या माध्यमातून शालेय वाचनालयासाठी 75 पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम मारुती दिघे, माजी सरपंच पोपट पोटे, शिक्षणा फाउंडेशन स्वाती जोशी आदी उपस्थित होते. (Junnar)

कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्य.समिती अध्यक्ष मारुती बन्सी दिघे, काळू लांघी, तान्हाजी दिघे यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक अंकुश साबळे यांनी केले तर आभार दत्तात्रय भोईर यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती

वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय