सातारा / क्रांतिकुमार कडुलकर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी खुर्द ता.माण येथील शाळेला मुरलीधर नागेश काळे परिवारातर्फे संगणक भेट देण्यात आला. ग्रामीण भागातील या शाळेला इलर्निंग सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमास मदत म्हणून येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्वर्गीय मातोश्री कुसुम काळे यांच्या स्मृती निमित्त हा उपक्रम राबवण्यात आला,असे रवींद्र काळे यांनी सांगितले.

यावेळी काळे परिवारातील मुरलीधर नागेश काळे, रविंद्र मुरलीधर काळे, वासंती रवींद्र काळे, भूषण सुभाष भोंडे, सुवर्णा सुभाष भोंडे, प्रसाद मधुसूदन कुलकर्णी, तेजश्री प्रसाद कुलकर्णी, कुमारी रिशिका प्रसाद कुलकर्णी, रियाझ प्रसाद कुलकर्णी आदी लहान थोर परिवार सदस्य उपस्थित होते.

या प्रसंगी शिंदी खुर्द गावचे सरपंच प्रमोद कद्रे, माणिकराव कदम (ग्राम पंचायत सदस्य) , सुभाष काटकर (माजी सरपंच), संतोष जाधव (माजी ग्राम पंचायत सदस्य) , पांडुरंग कुलकर्णी (सेवानिवृत्त शिक्षक) , विठ्ठल जाधव, माणिक खरात (माजी सैनिक) सह नंदकुमार जाधव (शाळा व्यवस्थापन समिती), मुख्याध्यापक गुलाबराव काळे, बापूराव कुचेकर, रत्नमाला पवार (पदवीधर शिक्षक), सुमन जगदाळे, अमोल नाळे (उपशिक्षक) व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना माणिकराव खरात माजी सैनिक यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप मॅडम रत्नमाला पवार यांनी केले.



हे ही वाचा :
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून
अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान
धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या
‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण
MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

