Thursday, December 26, 2024
HomeNewsघोडेगाव : एसएफआय तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी अभिवादन

घोडेगाव : एसएफआय तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी अभिवादन

घोडेगाव (ता.१९) : घोडेगाव येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

यावेळी किसान सभेचे तालुका कार्याध्यक्ष बाळू काठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलताना म्हटले कि, ‘शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी आणि रयतेच्या हिताचे निर्णय घेणारे राजे होते, आजच्या राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज हे कल्याणकारी धोरण अभ्यासले पाहिजे आणि सर्व समाज घटकांच्या विकासाचे निर्णय घेणे आवश्यक आहे.’

दरम्यान, एसएफआयच्या वतीने प्रा.स्नेहल साबळे व विनोद केंगले यांचे सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी किसान सभेचे तालुका कार्याध्यक्ष बाळू काठे, एसएफआयचे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी, उपाध्यक्ष रोषण पेकारी, सदस्य विकास बांबळे , प्रतिक वाळकोळी इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर गारे यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश हिले यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय