जुन्नर / प्रा.सतिश शिंदे : जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील पर्यटन तालुका असून या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी, ओझर, लेण्याद्री, नाणेघाट, बौध्दकालीन लेण्या आहेत. ही महत्वाची ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक राज्याच्या कानाकोपर्यातून जुन्नर तालुक्यात येत असतात.
मात्र, जुन्नर शहराचे मुख्य दळणवळणाचे नविन बस स्थानक हे असून बस स्थानकामागे तलाठी कार्यालय व बाजूलाच महावितरणचे मुख्य कार्यालय असून याच कार्यालयाच्या भिंतीच्या बाहेरील बाजूस सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाचा मुख्य रस्ता व गटारे आहेत. मात्र, हि गटारे अक्षरश: झाडाचा पालापाचोळा, प्लॅस्टिक पिशव्या व इतर कचर्याने भरले आहेत. महिनाभरावर पाऊस येऊन ठेपला असून या कचर्यामुळे पावसाचे पाणीदेखील तुंबले जाऊ शकते. प्रशासनाने या गोष्टीकडे तातडीने लक्ष देऊन हा कचरा उचलून योग्य अशी विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. जेणेकरून दुर्गंधी व डास होणार नाही.
तसेच या ठिकाणी वडापावची दुकाने व टपऱ्यादेखील आहेत. प्रवासी व पर्यटक या ठिकाणी येऊन खाण्याचे पदार्थदेखील खात असतात. त्यामुळे हा कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी पर्यटक व वाहनचालक मागणी करत आहेत.
हे ही वाचा :
शिवपूत्र संभाजी महाराज महानाट्य पोलिसांकडून बंद पाडण्याची धमकी; खासदार अमोल संतापले !
अकोल्यात 2 गटात हिंसक हाणामारी, कलम 144 लागू
ब्रेकिंग : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची कुस्ती महासंघ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी !
कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय