Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर : राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक उत्साहात

जुन्नर : जुन्नर शहरातील राजमाता जिजाऊ महिला मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. Ganesh immersion procession of Rajmata Jijau Mahila Mandal in excitement 

---Advertisement---

राजमाता महिला मंडळाचे हे दुसरे वर्ष असून गणेशोत्सानिमित्त संगीतखुर्ची, चमचा लिंबू, अन्नकोट स्पर्धाउखाणे स्पर्धा, मातृपितृपूजन, अर्थवशिर्ष पठण, आरोग्य विषयक मार्गदर्शन, पैठणीचा लकी ड्रा असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले होते. 

---Advertisement---

मंडळाच्या कार्यकर्त्यां जिजाऊच्या वेशभूषेत विसर्जन मिरवणूकीत सामील झाल्या होत्या. रणरांगिनी महिला लेझीम पथक ओतूर व स्वामी समर्थ महिला लेझीम ढोल पथक गोळेगाव हे विसर्जन मिरवणूकीचे खास आकर्षण होते. या विसर्जन मिरवणूकीत आमदार अतुल बेनके यांच्या पत्नी गौरीताई बेनके व माजी आमदार शरद सोनवणे यांच्या पत्नी सीमा सोनवणे सामील झाल्या होत्या. सलग ४ तास मिरवणूक शांततेत संपन्न झाली.

राजमाता जिजाऊ विकास मंचाच्या अलकाताई फुलपगार, राखी शहा, ज्योती चोरडिया, रत्ना घोडेकर, राजश्री कांबळे, श्वेता पवार, वैशाली भालेकर, सुरेखा जढर, अनुराधा गरीबे, संगीता बेळे, पुजा बुट्टे, मंजू चव्हाण, विजया डोके, भुमिषा खत्री, साधना फुलपगार, स्वाती पवार, स्वाती डोंगरे, मंगल शिंदे, गीतांजली डोके आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles