Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Shivajirao Adhalarao Patil : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

पुणे : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. या पार्श्वभुमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपासाठी बैठका होत आहे. शिरूर मतदार संघात देखील मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशात शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) हे अजित पवार गटाच्या (Ajit Pawar) वाटेवर असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

---Advertisement---

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नुकतीच पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांना म्हाडाचे (Pune MHADA) अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याचं म्हटलं जात आहे. असे असताना आता आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

शिरूर लोकसभेसाठी (Shirur Lok Sabha Election) शिवाजीराव आढळराव पाटील हे आग्रही आहेत. मात्र, शिरुर लोकसभा राष्ट्रवादीच लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभुमीवर आढळराव पाटील यांनी 29 फेब्रुवारीला आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी इथं तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

---Advertisement---

सध्या शिरुर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे इच्छुक आहेत. शिरुर लोकसभेसाठी अद्याप उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नाही.

हेही वाचा :

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे

मोठी बातमी : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थसंकल्पात अजित पवार यांची घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प, केल्या मोठ्या घोषणा

मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, त्यांची एसआयटी चौकशीही होणार

यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याने अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मागितली माफी

भयंकर अपघात : एकावेळी 23 जणांचा मृत्यू, अनेक घरात आरडा ओरडा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles