बारामती : तांदुळवाडी गावाचे सुपुत्र भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे मेजर विकास रतिलाल गिरीमकर यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम शासकीय इतमामात तांदुळवाडी येथे आज सकाळी ठीक ११ वा. पार पडला.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील, माजी सैनिक संघटना अध्यक्ष निंबाळकर, शहराध्यक्ष अमर धुमाळ, स्थानिक नगरसेवक समीर चव्हाण व महिला बालकल्याण उपसभापती ज्योती भारत सरोदे, उपसभापती, गिरमकर कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक तसेच समस्त ग्रामस्थ तांदूळवाडी यांचे उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून व तीनवेळा बंदुकीची सलामी देवून अग्नी देण्याचा कार्यक्रम शासकीय इतमामात संपन्न झाला.