Saturday, October 5, 2024
Homeजिल्हामहाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकविज्ञान दिनदर्शिका 2022 प्रकाशित

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकविज्ञान दिनदर्शिका 2022 प्रकाशित

पुणे : विज्ञान, पर्यावरण, जनआरोग्य ई सर्व विषयात अभ्यासपूर्ण कार्य करणाऱ्या लोकविज्ञान संघटनेच्या दिनदर्शिकेचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

या दिनदर्शिकेची माहिती देताना संघटनेचे सचिव अविनाश हावळ म्हणाले की, जागतिक तापमानवाढीच्या महासंकटाचा धोका लक्षात घेता ‘लोकविज्ञान-दिनदर्शिका २०२२’ मध्ये “प्रलयंकारी जागतिक तापमानवाढ आणि त्यावरील लोकवैज्ञानिक मार्ग” यावर लक्ष केंद्रित केले आहे. 

भिंतीवर टांगायच्या लोकविज्ञान – दिनदर्शिकेचा आकार या वर्षी निम्मा केला आहे. भिंतीवरील कॅलेंडरवरील प्रत्येक पानावर एका वैज्ञानिकाचा फोटो, त्या वैज्ञानिकाची अगदी थोडक्यात तोंड-ओळख तसेच त्या त्या महिन्यातील विज्ञान-दिन आणि तारांगण हे सर्व आहे. मात्र दिनदर्शिकेच्या पानावर असणारी टिपणे आता दिनदर्शिके सोबतच्या ६४ पानी पुस्तिकेत आहेत. त्यामुळे ती वाचणे, वर्ष-अखेरी जपून ठेवणे अधिक सहजी होईल. 

‘पर्यावरणीय विज्ञान’ तसेच ‘जागतिक तापमानवाढीच्या महासंकटाचा धोका’ याबाबत मोलाची भर घालणारे वैज्ञानिक, भाष्यकार, कार्यकर्ते यांच्या बाबत बारा छोटे लेख पुस्तिकेत आहेत. तसेच तापमानवाढीचे प्रलयंकारी महासंकट, त्याची कारणमीमांसा व ती करतांना गरीब-श्रीमंत यांच्यात फरक करण्याची गरज, तंत्र-वैज्ञानिक प्रगतीमुळे कर्ब-प्रदूषण घटवण्यासाठी उपलब्ध झालेला क्रांतिकारी मार्ग, इ. विषयांवर वर बारा लेख आहेत. अतुल देऊळगावकर, अच्युत गोडबोले, प्रियदर्शिनी कर्वे, संजय मं गो. प्राची शेवगावकर, गिरीश सोहोनी, अमोल फडके इ. तज्ञांचे ते आहेत.

कॅलेंडर ची किंमत 30 रुपये आहे. दहा किंवा त्यापेक्षा जादा प्रति घेणाऱ्यांना पुढीलप्रमाणे  सवलत आहे. शिवाय पार्सलचा खर्च लोकविज्ञान संघटना करेल. 

१० ते २४ प्रती – १० %

२५ ते ४९ प्रती – १५%

५० ते ९९ प्रती – २०%

१०० ते १९९ प्रती – २५%

२०० ते ४९९ प्रती –  ३०%

५०० च्या वर – ३३%

संपर्क – अविनाश हावळ, सेक्रेटरी लोकविज्ञान संघटना. फोन – ९८२२२६८०५

प्रमोद तांबे – ९५३७९५९३५७


संबंधित लेख

लोकप्रिय