Friday, January 3, 2025
Homeराज्यशेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातील शेतकरी हजारोंच्या संख्येने दिल्लीला जाणार

शेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातील शेतकरी हजारोंच्या संख्येने दिल्लीला जाणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी हजारोंच्या संख्येने दिल्लीला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेने दिली आहे.

किसान सभेच्या राज्य कौन्सिलची ऑनलाईन बैठक दिनांक 14 डिसेंबर रोजी संपन्न झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रातील शेतकरी 21 डिसेंबर रोजी नाशिक येथून दिल्लीला कूच करणार आहेत. दिल्लीला जाणारे हे शेतकरी आपल्या साधनसामग्रीसह नाशिक येथून रवाना होतील, अशी माहिती किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी.गावीत, राज्याध्यक्ष किसन गुजर, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले, उमेश देशमुख यांंनी दिली.

संबंधित लेख

लोकप्रिय