Tuesday, November 5, 2024
Homeग्रामीणकुंभाळे गावातील युवकांनी भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

कुंभाळे गावातील युवकांनी भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

 

नाशिक : पेठ तालुक्यातील  कुंभाळे गावातील युवकांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशात चालू असलेल्या कोविड-19 मुळे खेळाडूंना  मास्कचा वापर करणे,सॅनिटायझ व शारीरिक अंतर पाळणे अनिवार्य राहील. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच सर्व क्रिकेट मॅचेस खेळवले जातील असे सांगितले आहे.

  

या स्पर्धेला KPL असे नाव देण्यात आले आहे.६०० रुपये प्रवेश फी ठेवून चार बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस नरहरी झिरवाळ फाऊंडेशन चे अध्यक्ष गोकुळ झिरवाळ यांच्याकडून ११००० रुपये, तर दुसऱ्या क्रमांकाचे युवासेनेचे जगदीश गावित यांच्याकडून ७००० रुपये, तर तिसऱ्या क्रमांकाचे युवासेनेचे मोहन कामडी यांच्याकडून ५००० रुपये आणि चौथ्या क्रमांकाचे कुंभाळे गावातील सरपंच आनंदीबाई शिंगाडे यांच्याकडून ३००० रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांनी संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.९०७५६५७६७७,८७६६४४२५०० या क्रमांकावर संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करा.त्याचबरोबर पेठ, सुरगाणा, हरसूल, कापराडा(गुजरात) मधील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आव्हान हंसराज भोये, दिलीप गावित, अशोक भसरे, विशाल गावित, रोतेश भसरे, भूषण शेवरे, चिंतामण गावित, चंदर लोखंडे, निखिल आवारी, युवराज शिंगाडे आदी युवकांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय