Friday, February 21, 2025

Fake Call : बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; १३ जण अटकेत

डेहराडून : उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये (Dehradun) परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष कृती दल (STF) आणि कोतवाली पटेल नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १३ जणांना अटक केली आहे. (Fake Call)

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी ICS (I Create Solution) नावाच्या कंपनीच्या नावाखाली सहारनपूर रोडवरील चमन विहार येथे अवैध कॉल सेंटर चालवले होते. ते अमेरिकन आणि कॅनेडियन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट व अॅपलचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगून फसवत होते.

परदेशी नागरिकांची फसवणूक (Fake Call)

गुन्हेगार पीडितांना पॉप-अप संदेश पाठवत आणि त्यांच्या खात्यात फसवणूक झाल्याचे सांगून घाबरवत असत. त्यानंतर भीती दाखवून पैसे उकळत होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष कृती दलाने छापा टाकून आरोपींना रंगेहाथ पकडले. चौकशीत त्यांनी हे कॉल सेंटर बराच काळ डेहराडूनमध्ये चालवत असल्याची कबुली दिली.

जप्त केलेला माल

विशेष कृती दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) नवनीत भुल्लर यांनी सांगितले की, आरोपींकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, परदेशी नागरिकांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Dehradun)

छाप्यात १३ लॅपटॉप, २ WiFi राऊटर, ३ स्विचेस, १ मीडिया कन्व्हर्टर, १० हेडफोन्स, ४ मोबाइल फोन, १० लॅपटॉप चार्जर, ५ माउस या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी आरोपींविरोधात सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यांना कलम ३५ अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. आरोपींकडून परदेशी नंबरवर केलेले कॉल आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. पुढील तपास सुरू असून, या सायबर टोळीचे इतर सहकारीही लवकरच पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हे ही वाचा :

LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!

‘छावा’ चित्रपट 7 दिवस मोफत दाखवला जाणार, वाचा कुठे पाहता येणार ?

महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट होणार जागतिक वारसास्थळ

धक्कादायक : इंधनात ८०% पाणी २०% पेट्रोल मिसळून विक्री

Related Articles

- Advertisement -

Latest Articles